Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अजय देशमुख व परीक्षा संचालकपदी डॉ. विनोद पाटील

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अजय देशमुख यांची तर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. विनोद पाटील यांची वर्णी लागली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अजय देशमुख व परीक्षा संचालकपदी डॉ. विनोद पाटील
SHARES

गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकपदी व कुलसचिवपदी पूर्ण वेळ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. अजय देशमुख यांची तर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. विनोद पाटील यांची वर्णी लागली आहे.


३२ उमेदवारांमधून नियुक्ती

मुंबई विद्यापीठानं दिनांक १५ ऑक्टोबर, २०१८ रोजी कुलसचिव आणि संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ या दोन पदांसाठी जाहिरात प्रसिद्धी केली होती. या जाहिरातीनंतर कुलसचिव पदासाठी एकूण ४९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ३२ उमेदवार यासाठी पात्र ठरले. या उमेदवारांपैकी २४ उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली.


२४ मधून लागली वर्णी

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी एकूण २९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननी समितीनं २४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवले गेले. त्यातील १८ उमेदवार मुलाखतीला हजर होते. या दोन्ही पदांसाठीच्या मुलाखती ६ आणि ७ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात आल्या.


डॉ. अजय देशमुखांचा अल्प परिचय

कुलसचिव पदावर नवनियुक्त झालेले डॉ. अजय देशमुख हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कुलसचिव पदावर कार्यरत असून, त्याआधी त्यांनी डायरेक्टर बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट या पदावरही काम केलं आहे. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इंग्रजी या विषयात घेतलं असून पीएचडीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे.


डॉ. विनोद पाटील याचा अल्प परिचय

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी नियुक्त झालेले डॉ. विनोद पाटील हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सिस्टम अॅनॅलिस्ट या पदावर कार्यरत असून, १९ जानेवारी २०१२ ते १७ जानेवारी २०१३ या काळात ते मुंबई विद्यापीठात उपकुलसचिव या पदावर होते. पाटील यांनी मास्टर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट ही पदव्युतर पदवी पूर्ण केली असून कम्प्युटर मॅनेजमेंट या विषयांत पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे.



हेही वाचा-

संपाची संक्रांत कायम, मंगळवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी

'हिरवळीचा झेंडा' रोखणार राष्ट्रध्वजाचा अवमान!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा