'हिरवळीचा झेंडा' रोखणार राष्ट्रध्वजाचा अवमान!

२६ जानेवारी तसंच १५ ऑगस्ट या दिवशी प्रत्येक भारतीयाचा राष्ट्राभिमान जागृत होतो. या दिवशी मोठ्या आनंदाने सर्वजण राष्ट्रध्वज लावून आपलं देशप्रेम व्यक्त करतात, पण दुसऱ्या दिवशी मात्र याच राष्ट्रध्वजाची दुरावस्था झाल्याचं आढळतं आणि राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. आता 'हिरवळीचा झेंडा' राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणार आहे

  • 'हिरवळीचा झेंडा' रोखणार राष्ट्रध्वजाचा अवमान!
SHARE

२६ जानेवारी तसंच १५ ऑगस्ट या दिवशी प्रत्येक भारतीयाचा राष्ट्राभिमान जागृत होतो. या दिवशी मोठ्या आनंदाने सर्वजण राष्ट्रध्वज लावून आपलं देशप्रेम व्यक्त करतात, पण दुसऱ्या दिवशी मात्र याच राष्ट्रध्वजाची दुरावस्था झाल्याचं आढळतं आणि राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. आता 'हिरवळीचा झेंडा' राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणार आहे.

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी सर्व भारतीय मोठ्या अभिमानानं तिरंगा लावतात; परंतु हाच तिरंगा दुसऱ्या दिवशी अनावधानानं रस्त्यावर, रस्त्याच्या कड़ेला, झाडाच्या बुंदयात किंवा इतरत्र पडलेला दिसतो. यामुळं राष्ट्रध्वजाचा अपमान होत असून, हा अपमान रोखण्यासाठी सायनच्या डी.एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली तिरंग्याची शक्कल लढवली आहे.


असा आहे इकोफ्रेंडली तिरंगा

इकोफ्रेंडली तिरंगा कागदापासून बनवण्यात आला असून, हा पकडण्यासाठी लाकडाच्या काडीऐवजी कागदी स्ट्रॉचा वापर करण्यात आला आहे. या स्ट्रॉमध्ये वांगी, भेंडी यांसारख्या फळभाज्या, तसंच सुर्यफूल, मोगरा यांसारख्या विविध फुलांच्या बिया व खत टाकलेलं आहे. त्यामुळं हा झेंडा कुंडीत लावल्यास त्यातून झाडं उगवेल. त्यामुळे तिरंग्याचा होणारा अपमाना आपोआपच रोखला जाईल. डी. एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे संजय खंदारे यांच्या संकल्पनेतून 'एक झेंडा हिरवळीचा' हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे हा इकोफ्रेंडली झेंडा तयार करण्यात आला आहे.


या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली तिरंगा बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार असून, हस्तकलेच्या वर्गात विद्यार्थी हा झेंडा तयार करतील. त्यानंतर शाळेतील आठवी व नववीचे विद्यार्थी इकोफ्रेंडली तिरंग्याचं महत्त्व खासगी, कॉर्पोरेट कंपन्या, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन समजावून सांगतील. त्यानंतर हेच विद्यार्थी या तिरंग्याचं सेल्स आणि मार्केटिंगही करतील.


मराठी शाळांना आज निधीची गरज आहे. लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून शाळेसाठी निधी संकलन कसं करता येईल, यावर विचारमंथन करत असताना 'एक झेंडा हिरवळीचा' या उपक्रमाचा जन्म झाला. या उपक्रमातून होणारा नफा आम्ही शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी आमचं योगदान म्हणून देणार आहोत. त्याशिवाय या तिरंग्याच्या संकल्पनेचं जागतिक पेटंट घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

- संजय खंदारे, माजी विद्यार्थी

शाळेचे अनेक माजी विद्यार्थी निधी संकलनासाठी शाळेला मदत करत आहेत. अनेक नवनव्या कल्पना राबवण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. कल्पक उपक्रम राबवण्यासाठी माजी विद्यार्थी त्यांची नोकरी-धंदा सांभाळून शाळेला वेळ देत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. तसंच 'एक झेंडा हिरवळीचा' या संकल्पनेतून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २० हजार इकोफ्रेंडली तिरंग्याचा विक्रीचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आलं आहे.

- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूलहेही वाचा - 

खुशखबर! फक्त १५३ रुपयांत पहा १०० वाहिन्या

आणखी तीन कॉलेजांना स्वायत्ततासंबंधित विषय
ताज्या बातम्या