Advertisement

आणखी तीन कॉलेजांना स्वायत्तता

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठातील भानुबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स, खार येथील एच.जे.कॉलेज ऑफ एज्युकेशन, पनवेल येथील चांगु काना ठाकूर कॉलेज या तीन कॉलेजांना विद्यापीठ अनुदान आयोगा(युजीसी)नं स्वायत्ततेचा दर्जा दिला आहे.

आणखी तीन कॉलेजांना स्वायत्तता
SHARES

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठातील भानुबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स, खार येथील एच.जे.कॉलेज ऑफ एज्युकेशन, पनवेल येथील चांगु काना ठाकूर कॉलेज या तीन कॉलेजांना विद्यापीठ अनुदान आयोगा(युजीसी)नं स्वायत्ततेचा दर्जा दिला आहे. यामुळं आता मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित स्वायत्तता कॉलेजांच्या संख्येत वाढ झाली आहे.


स्वायत्ततेचं वैशिष्ट्य काय?

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या स्वायत्तता कॉलेजांना त्यांचा अभ्यासक्रम व शिक्षणक्रम ठरविण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं. तसंच नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षांबाबतही स्वातंत्र्य मिळतं. यानुसार आता मुंबईतील दोन आणि पनवेलमधील एका कॉलेजला हे स्वातंत्र्य मिळणार आहे.


पाच कोटींचा निधी

'नॅक' मूल्यांकनात ३.५ पेक्षा जास्त गुण असलेल्या कॉलेजांना स्वायत्तता देण्याचं धोरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जाहीर केलं आहे. त्यानंतर राज्यातील गुणवान असलेल्या ३६ कॉलेजांनी स्वायत्तता प्रक्रियेची सुरुवात केली होती. यातील काही कॉलेजांना यापूर्वी स्वायत्तता देण्यात आली आहे. या यादीत महिनाभरापूर्वी मुंबईतील पाटकर आणि खालसा कॉलेजांचा समावेश झाला आहे. त्यानंतर नुकतंच आठ कॉलेजांना स्वायत्तेचं पत्र मिळालं असून यांना पहिल्या पाच वर्षासाठी शैक्षणिक स्वायत्तता देण्यात आली आहे. त्याशिवाय या कॉलेजांना रूसा मार्फत पाच कोटींचा निधीही उपलब्ध होणार आहे.


काही कॉलेज प्रतीक्षेत

आतापर्यंत मुंबईतील १६ कॉलेजांना स्वायत्तता मिळाली असली तरी अद्याप मुंबईतील एम.एम.पी. शाह महिला कॉलेज, आर.ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स, निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क ही तीन कॉलेज स्वायत्ततेच्या प्रतीक्षेत आहेत.


यांना मिळाली स्वायत्तता

  • भानुबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स, माटुंगा
  • ए.च.जे. कॉलेज ऑफ एज्युकेशन, खार
  • चांगु काना ठाकूर कॉलेज, पनवेल
  •  कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, पंढरपूर
  • छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
  •  सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
  •  तुळजाराम चतुरचंद कॉलेज, बारामती
  • श्री. परशुरामभाऊ कॉलेज, पुणेहेही वाचा -

दीक्षान्त सभारंभातील सुवर्णपदकांवर मुलींची बाजी
संबंधित विषय
Advertisement