Advertisement

दीक्षान्त सभारंभातील सुवर्णपदकांवर मुलींची बाजी

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त संभारभ सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. इतर क्षेत्रांप्रमाणे या सोहळ्यातही मुलींनी बाजी मारत ४० पैकी ३३ सुवर्णपदकांवर आपलं नाव कोरलं आहे.

दीक्षान्त सभारंभातील सुवर्णपदकांवर मुलींची बाजी
SHARES

मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त संभारभ सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. इतर क्षेत्रांप्रमाणे या सोहळ्यातही मुलींनी बाजी मारत ४० पैकी ३३ सुवर्णपदकांवर आपलं नाव कोरलं आहे. यंदा पदवी व पदव्युत्तर शाखांमधील एकूण १ लाख ९३ हजार ५८९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या असून, यात १ लाख ४ हजार ५९४ विद्यार्थिनी, तर ८८ हजार ९९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


प्रमुख पाहुणे जॉन रॉबर्टस

दीक्षान्त संभारभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस उपस्थित होते. या सभारंभामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील १ लाख ६ हजार ७२४ सर्वाधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. त्या पाठोपाठ विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील ५४ हजार ९८०, मानव्यविज्ञान शाखेतील २४ हजार २८२, आंतरविद्याशाखेतील ७ हजार ६०३ विद्यार्थ्यांना पदव्या मिळवल्या आहेत. त्यासोबतच विविध शाखेतील ३३२ विद्यार्थ्यांनी एमफील पीएचडी पदवी मिळवली आहे.


४० विद्यार्थ्यांना ५२ पदकं

विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या ४० विद्यार्थ्यांना ५२ पदकं देऊन गौरवण्यात आलं असून, त्यात ५१ सुवर्ण व एका रौप्य पदकाचा समावेश आहे. यातील ४० पदकांपैकी ३३ सुवर्णपदकं विद्यार्थीनींच्या नावावर आहेत. सहा विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन-दोन पदकं मिळवली आहेत, तर विधी शाखेतील भूमी दफ्तरी व पार्श्व बानखरिया या दोन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी चार-चार पदकं मिळवली आहेत.


आकडेवारी


पदवीएकूण विद्यार्थीटक्के
विद्यार्थी विद्यार्थिनी
पदवीधर१ लाख ६० हजार २१८८२. ७६ ७६ हजार ८०९
८३ हजार ४०९
पदव्युत्तर३३ हजार ३७१
१७.२४१२ हजार १८६२१ हजार १८५
एकूण१ लाख ९३ हजार ५८९
१००८८ हजार ९९५
१ लाख ०४ हजार ५९४



हेही वाचा - 

पाच वर्षात ३५० रेल्वे अपघातात ४१९ प्रवाशांचा मृत्यू, १०२४ जखमी

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकपदी कोण?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा