Advertisement

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकपदी कोण?

गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन विभागाच्या संचालकपदी लवकरच पूर्ण वेळ संचालकाची निवड करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकपदी कोण?
SHARES

गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन विभागाच्या संचालकपदी लवकरच पूर्ण वेळ संचालकाची निवड करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या जाहिरातीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून परीक्षा विभागाच्या संचालक पदासाठी एकूण २४ जणांनी अर्ज केले आहेत.


दोन वर्षापासून पद रिक्त

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या माजी परीक्षा संचालक दिनेश भोंडे यांची संचालकपदाची मुदत संपल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यानंतर या पदावर कायमस्वरूपी संचालकाची नेमणूक व्हावी यासाठी दोनदा मुलाखती घेण्यात आल्या होत्या, मात्र याबाबत योग्य उमेदवार मिळाला नव्हता. त्यानंतर विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्या कारकिर्दीत झालेल्या निकाल गोंधळानंतर परीक्षा विभागाला विद्यार्थ्यांसह प्रशासनाची टीका सहन करावी लागली होती.


अतिरिक्त जबाबदारी

त्यातच परीक्षा विभागात उघडकीस होणाऱ्या विविध गोंधळामुळं नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन विभाग संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालक म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. गेल्या दीड वर्षापासून घाटुळे परीक्षा विभागाच्या संचालक पद सांभाळत असून येत्या काही दिवसात डॉ. अर्जुन घाटुळे नाशिकला परत जाणार आहेत.


तीन महिन्यांपूर्वी जाहिरात

दिवसेंदिवस विद्यापीठात वाढत जाणारी विद्यार्थी संख्या, परीक्षा विभागावरील ताण, त्यात निकाल वेळेवर लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यामुळं विद्यापीठातील प्रभारी पद कमी करून त्यावर पूर्ण वेळ पदांची भरणा करण्यात यावी यासाठी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी तगादा लावला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन विभागातील संचालक पदासाठी १५ ऑक्टोबर २०१८ जाहीरात प्रसिद्घ करण्यात आली. या जाहिरातीला तीन महिन्यांत उत्तम प्रतिसाद मिळाला असून संचालकाची निवड करण्यासाठी विद्यापीठानं विशेष समितीही गठित केली आहे.


२४ अर्ज 

संचालकापदासााठी आतापर्यंत एकूण जणांनी अर्ज केले असून नुकतीचं विद्यापीठानं नेमलेल्या समितीनं एकूण १८ जणांची मुलाखत पार पडली. यातील अंतिम उमेदवारांपैकी एका नावाची घोषणा येत्या आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यामुळं परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा