Advertisement

खुशखबर! फक्त १५३ रुपयांत पहा १०० वाहिन्या

केबल डीटीएच वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने खुशखबर दिली आहे. आता टेलिव्हीजन प्रेमींना आपल्या आवडीच्या १०० वाहिन्या फक्त १५३.४० रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

खुशखबर! फक्त १५३ रुपयांत पहा १०० वाहिन्या
SHARES

केबल आणि डीटीएच वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने खुशखबर दिली आहे. आता टेलिव्हीजन प्रेमींना आपल्या आवडीच्या १०० वाहिन्या फक्त १५३.४० रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहेत. ट्रायनं केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादारांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनल्स दाखवण्याचे निर्देश दिले आहेत.


१५३.४० रुपयांत १०० वाहिन्या

ट्रायच्या नव्या नियमानुसार, ३१ जानेवारीपर्यंत ग्राहकांना टीव्हीवरील पसंतीच्या एकूण १०० वाहिन्या निवडायच्या आहेत. ग्राहकांनी निवडलेल्या १०० वाहिन्या केबल ऑपरेटर आणि डीटीएच सेवा पुरवठादार १५३.४० रुपयांत दाखवतील. या रकमेत जीएसटीचाही समावेश असल्याने कर स्वरूपातही कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारण्यात येणार नाही. मात्र या शंभर चॅनल्समध्ये कोणत्याही एचडी चॅनेलचा समावेश नसेल.


वाहिन्या निवडण्याची संधी

ट्रायच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता आपल्या पसंतीच्या वाहिन्या निवडण्याची संधी मिळाली आहे. वाहिन्यांची निवड करताना कोणतीही अडचण आल्यास ट्रायच्या ०११-२३२३७९२२ (ए.के. भारद्वाज) आणि ०११-२३२२०२०९ (अरविंद कुमार) या फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन ग्राहकांना केलं आहे. तसंच, काही तक्रार असल्यास ग्राहक advbcs-2@trai.gov.inआणि arvind@gov.in. या ईमेल्सवर नोंदवू शकतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा