Advertisement

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना विशेष रजा मंजूर


गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना विशेष रजा मंजूर
SHARES

शैक्षणिक कृतिसत्रास उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातील शिक्षकांना शिक्षण विभागाने विशेष कर्तव्य रजा मंजूर केली आहे. महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे 37वे राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतिसत्र शनिवार २० आणि रविवार २१ जानेवारी रोजी नागपुरात होत असून या कृतिसत्राला उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना कर्तव्य रजा देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली होती.


अखेर शिक्षण विभागाकडून हिरवा कंदील

याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून कार्यवाही होत नव्हती. अखेर याबाबत शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयात हालचाली सुरू झाल्या. शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी व मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी शिक्षकांना विशेष रजा देण्यात आल्याचे आदेश दिले.


काय आहे कृतीसत्रात?

या शैक्षणिक कृतीसत्राला उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. अध्ययन व अध्यापन आनंददायी कसे करता येईल? बदललेल्या अभ्यासक्रमात उत्तरपत्रिकांचे, नव्याने आलेल्या कृतिपत्रिकेचे समीक्षण कसे करावे? यासह अन्य शैक्षणिक विषयांवर या कृतीसत्रात शोध निबंध सादर केले जाणार असून शासनाला काही शिफारशी केल्या जाणार आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा