Advertisement

'ती' पुस्तके 'ही' नाहीत! पुस्तकांतील आक्षेपार्ह मजकुरावर शिक्षणमंत्र्यांचा खुलासा

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर शिक्षण विभागाच्या अवांतर पुस्तक योजनेसाठी खरेदी केलेल्या पुस्तकांचा खुलासा करण्याची नामुष्की ओढविली. या पुस्तकांत काहीही आक्षेपार्ह मजकूर नसून तसा असल्यास किंवा निदर्शनास आल्यास अजून एका तज्ज्ञ समितीकडून या पुस्तकांची पाहणी करण्यात येईल, असं आश्वासन तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिलं.

'ती' पुस्तके 'ही' नाहीत! पुस्तकांतील आक्षेपार्ह मजकुरावर शिक्षणमंत्र्यांचा खुलासा
SHARES

शिक्षण विभागावर विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर शिक्षण विभागाच्या अवांतर पुस्तक योजनेसाठी खरेदी केलेल्या पुस्तकांचा खुलासा करण्याची नामुष्की ओढविली. या पुस्तकांत काहीही आक्षेपार्ह मजकूर नसून तसा असल्यास किंवा निदर्शनास आल्यास अजून एका तज्ज्ञ समितीकडून या पुस्तकांची पाहणी करण्यात येईल, असं आश्वासन तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिलं.


पुस्तकांत आक्षेपार्ह काहीही नाही

अवांतर वाचनासाठी आणलेल्या योजनेतील पुस्तकांत काहीतरी प्रचंड अश्लील आहे असा शोध विरोधकांनी लावला आहे. मात्र त्यांच्या हाती लागलेली पुस्तकं ही २ वर्षांपूर्वी त्याच प्रकाशनाने कुंभमेळ्यासाठी छापलेली पुस्तके असल्याचं स्पष्टीकरण तावडे यांनी दिलं. या योजनेसाठी जेव्हा प्रकाशकांकडून निविदा मागविण्यात आल्या तेव्हा त्या पुस्तकातील तो मजकूर बदलण्यात आला. त्यांच्या वेगळ्या प्रती शिक्षण विभागाला सादर केल्या.

यासंदर्भात तज्ज्ञ समितीने छाननी केली आणि ती पुस्तके विद्यार्थ्यांसाठी छापल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आत्ता छापलेल्या पुस्तकांत विद्यार्थ्यांसाठी काहीही आक्षेपार्ह नसल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वीची पुस्तकं दाखवून विरोधी पक्षानेच आपली नाचक्की केल्याची टीका त्यांनी केली.


पुस्तकांचा दर्जा चांगला

‘भारतीय विचार साधना’ यांचं जे पुस्तक २० रूपयांना उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क ५० रूपयांत खरेदी केलं, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. यावर उत्तर देताना त्यांनी जे पुस्तक दाखवलं ती पुस्तकाची छोटी प्रत होती, त्याच्या मुखपृष्ठाचा आणि पानांचा दर्जाही इतका चांगला नव्हता. यंदा विभागाने विद्यार्थ्यांसाठी मागवलेल्या पुस्तकांचा दर्जा उत्तम असल्याने त्यांची किमत वाढल्याचं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


संत विखे पाटलांचं पुस्तक नाही

पुस्तक खरेदीत महापुरुषांच्या पुस्तकांपेक्षा मोदींची पुस्तकं जास्त असल्याची ओरड सध्या सुरु आहे. ही ओरड खोटी असून इतर महापुरुषांची पुस्तकं आणि पौराणिक कथांची पुस्तकं यांचा समावेश असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. मात्र या पुस्तकांत संत विखे पाटलांचं पुस्तक नसल्याची बोचरी टीका त्यांनी केली.


शिक्षणमंत्र्यांचा राग अनावर

पुस्तकांतील आक्षेपार्ह मजकूर प्रकाशन संस्थेने बदलला असल्याचा दावा शिक्षणमंत्र्यांनी केला. मात्र बदललेला मजकूर जेव्हा त्यांना वाचून दाखवण्यात आला आणि त्यावर हा मजकूर विद्यार्थ्यांसाठी कितपत योग्य आहे, असा सवाल केला. तेव्हा शिक्षणमंत्र्यांचा राग अनावर झाला. तज्ज्ञ समितीने या पुस्तकांची निवड केल्याचं जरी शिक्षणमंत्री विनोद तावडे सांगत असले, तरी त्यातील मजकूर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच नाही हे स्पष्ट झालं आहे.



हेही वाचा-

मीलन, कामातुर, कौमार्यभंग, पाचवीच्या मुलांना अर्थ काय सांगणार?

महापुरूषांच्याही वरचढ 'मोदी भक्ती'चं बजेट, पुस्तक खरेदीसाठी ६० लाखांचा खर्च


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा