Advertisement

महाराष्ट्र-साऊथ वेल्स विद्यापीठात शैक्षणिक करार


महाराष्ट्र-साऊथ वेल्स विद्यापीठात शैक्षणिक करार
SHARES

'महाराष्ट्रातून ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विदयापीठामध्ये संशोधनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनाचा वापर लोकल टू ग्लोबल असा करावा', असे मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे शनिवारी ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विद्यापीठाचे कुलगुरू लॉरी पिअर्सी आणि महाराष्ट्रातील उच्च-तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. या सामंजस्य करारावर लॉरी पिअर्सी आणि उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी स्वाक्षऱ्या केल्या.


'याचा' उपयोग राज्याच्या विकासासाठी व्हावा'

'महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या दरवर्षी जवळपास 70 लाख आहे. मात्र पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करणाऱ्यांची संख्या कमी आहे. आता या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी ऑस्ट्रेलियाच्या विदयापीठामध्ये जाऊन संशोधन करणार आहेत. या विद्यार्थ्यांचे संशोधन देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरताना महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याचा उपयोग होणे आवश्यक आहे', असे तावडे यांनी यावेळी सांगितले.


'ही विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी'

साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्रकुलगुरु लॉरी पिअर्सी यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितले, 'महाराष्ट्राला शैक्षणिक, आर्थिक, वाणिज्यिक, सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे साऊथ वेल्स विद्यापीठाला महाराष्ट्र राज्याबरोबर सामंजस्य करार करताना आनंद होत असून, या करारारमुळे संशोधन क्षेत्रात वेगळे काही करू इच्छिणाऱ्यांना येथील विद्यापीठात संशोधन करण्याची चांगली संधी मिळेल.' याचा फायदा ऑस्ट्रेलियाबरोबरच महाराष्ट्राला आणि पर्यायाने भारताला होणार आहे.


कोणकोण होते उपस्थित?

ऑस्ट्रेडचे वाणिज्य आयुक्त पीटर कोलेमन, अमित दासगुप्ता, मोहा व्यास, स्किन्धा मोईत्रा, ग्रेन ॲन लोबो, महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी, शिक्षण संचालक डॉ. धीरज माने, रोहित मनचंदा आदी मान्यवर उपस्थित होते.


कॅनबेरा आणि सिडनी कॅम्पसमध्ये शिकण्याची संधी

या सामंजस्य करारामुळे ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स विद्यापीठात महाराष्ट्राच्या 10 पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅनबेरा आणि सिडनी कॅम्पसमध्ये राहून शिकण्याची संधी मिळणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा