Advertisement

सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार
SHARES

राज्यातील कोरोना संक्रमणाच्या लाटेला रोखण्यासाठी कडक लाॅकडाऊन लावण्यात आलेला आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून १३ अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा केवळ आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. कोरोनाबाबतच्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे परीक्षा देण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरू देखील केल्या होत्या. त्यातच महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आल्याने सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

हेही वाचा- ICSE बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा रद्द

शहर आणि ग्रामीण भागांत अशा दोन्हीकडे कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण अत्यंत वेगाने होऊ लागलं आहे. अशा स्थितीत परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणं विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्याचबरोबर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लाॅकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतीरिक्त सर्व सेवा बंद राहणार आहेत. अत्यावश्यक कारणांशिवाय जिल्हाबंदी आणि सार्वजनिक वाहतूक सेवांवरही मर्यादा येणार आहेत. परिणामी घराबाहेर पडून परीक्षा केंद्रावर जाणं विद्यार्थ्यांसाठी जिकरीचं ठरणारं आहे. 

म्हणूनच महाराष्ट्रातील (maharashtra) सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं आहे. या परीक्षा देताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याची सूचना आणि विनंती सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना करण्यात आली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता संबंधित विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असे निर्देश देखील त्यांना देण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये लस दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असं देखील उदय सामंत यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा