Advertisement

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी१ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरचा कालावधी देण्यात आला होता. परंतु सरल डेटाबेसवर माहिती भरताना काही विद्यार्थ्यांना व कॉलेजांना बऱ्याच अडचणींना सामोर जाव लागत होतं. त्यामुळं शिक्षण मंडळांन २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत कॉलेज व विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिल्याचं परिपत्रक जाहीर केलं आहे.

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एचएससी (बारावी) बोर्डाच्या परीक्षेेचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. बारावी बोर्डाचा अर्ज भरण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून यामुळं अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  विशेष म्हणजे ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारलं जाणार नाही. 


परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च 

राज्यातून दरवर्षी साधारण १५ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस अर्ज करतात. त्यानुसार यंदाही बारावीच्या नियमित, पुर्नपरीक्षार्थी, श्रेणीसुधार अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आलं आहे. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.


विलंब शुल्क नाही

बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी१ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरचा कालावधी देण्यात आला होता. परंतु सरल डेटाबेसवर माहिती भरताना काही विद्यार्थ्यांना व कॉलेजांना बऱ्याच अडचणींना सामोर जाव लागत होतं. त्यामुळं शिक्षण मंडळांन २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत कॉलेज व विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिल्याचं परिपत्रक जाहीर केलं आहे. या परीपत्रकानुसार विद्यार्थ्यांना  २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार असून यासाठी नियमित शुल्कचं भरावं लागणार आहे. ३० ऑक्टोबरनंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. 


 प्रथमच सरलवरून अर्ज 

 यंदा प्रथमच सरल या डेटाबेसवरून विद्यार्थ्यांना अर्ज करायचं असून मॅनेजमेंट किंवा इतर अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित पद्धतीनं नोंद करावी लागणार आहे. बारावीचे हे अर्ज करताना सरल डेटामध्ये या विद्यार्थ्यांची आधीपासून नोंद असणं मात्र आवश्यक असणार आहे. 


एकदाच नोंदणी

बारावीचे अर्ज सरल नोंदणीनुसार होणार असल्यानं अकरावीत ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करणाऱ्या  विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नोंद करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसचं सरल पद्धतीनं नोंदणीनुसार जे प्रवेश छुप्या पद्धतीनं झाले आहेत त्यांची ऑफलाईन नोंदणी नसल्यानं असे प्रवेश या निमित्तानं बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



हेही वाचा- 

गैरप्रकारांमुळे मूल्यमापन चाचणी शाळास्तरावर होणार

दहावीत शिकवणाऱ्या शिक्षकांची माहिती आता ऑनलाईन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा