Advertisement

पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर होणार आहे.

पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. प्रवेशपूर्व नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, ३ लाख ३५ हजार २५६ विद्यार्थ्यांनी पदवी प्रवेशासाठी अर्जनोंदणी करण्यात आली आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफ काय असेल आणि विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी किती वेळ वाट पाहावी लागणार याचा अंदाज आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर येऊ शकणार आहे. प्रवेशपूर्व नोंदणीप्रक्रियेत विविध अभ्यासक्रमासाठी ५ लाख ३८ हजार ९५६ अर्ज आले असून, सकाळी ११ वाजता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी महाविद्यालयांमार्फत जाहीर केली जाणार आहे. १८ ते २५ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पार पाडता येणार आहे.

प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती टाळण्यासाठी महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येत असल्यास व प्रतिबंधित क्षेत्रात मोडत नसल्यास सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून ऑफलाइन प्रक्रिया राबवू शकतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा