SHARE

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता 10 वी) सवलतीचे वाढीव गुण देण्यासाठी शास्त्रीय संगीत, नृत्य व वादन तसेच लोककला क्षेत्रातील संस्थांची निवड करण्यात आली आहे. या संस्थानी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळतील.

इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी शासनमान्य असणाऱ्या 5 संस्थांमधील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील राखीव जागांवर सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापर्यंत प्रवेश देण्यात येत होता. त्या खालील 5 संस्थांचा शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता निवड केलेल्या संस्थांच्या यादीत समावेश करण्यात येत आहे. यानुसार प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती या विभागाच्या समक्रमांक 1 मार्च 2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, सरफोजी राजे भोसले डान्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नालंदा नृत्य कला महाविद्यालय, श्री वल्लभ संगीतालय, पुणे भारत गायन समाज या संस्थांची निवड करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांक 201704181510319423 असा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या