Advertisement

नवनीत समूहाचे डुंगरशीभाई गाला कालवश


नवनीत समूहाचे डुंगरशीभाई गाला कालवश
SHARES

नवनीत या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत डुंगरशीभाई रामजी गाला (८२) यांचे बुधवारी रात्री १० वाजता निधन झाले. गेले काही दिवस मृत्यूशी झुंज देत असणाऱ्या गाला यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी १० वाजता चंदनवाडीतील विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


गाईड प्रकाशनाचा प्रवास...

१९५५ साली गिरगावात एक छोटासा छापखाना आणि गाईड प्रकाशनाचा उद्योग गाला बंधू यांनी सुरू केला. सुमारे ६ दशकानंतर या कंपनीचे रुपांतर नवनीत पब्लिकेशन्स (इंडिया) लिमिटेड अशा मार्केट लिस्टेड कंपनीमध्ये झाले. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये हा ब्रॅण्ड घरोघरी पोहोचला आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गाईडची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी ओळखले. गावोगावी आणि तालुक्याच्या ठिकाणी फिरून त्यांनी आपली उत्पादने लोकप्रिय केली. मुलांना दर्जेदार अभ्यासोपयोगी साहित्य मिळावे आणि यासाठी मुंबईतील अग्रगण्य शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना त्यांनी गाईड लिहिण्यास प्रवृत्त केले.

आजच्या तंत्रयुगात जिथे शाळा डिजिटल होऊ लागल्या असताना विद्यार्थ्यांना ई लर्निंगसाठी CD Rom आणि तत्सम साहित्याची निर्मितीही नवनीत करते आहे.


सामाजिक कार्यही उल्लेखनीय

  • गावोगावी मुलांना शिक्षणासाठी कायम मदत 
  • ग्रामीण भागातील मुलांना वह्या, पुस्तक मिळावेत यासाठी प्रयत्न  
  • २००० साली कच्छमधील अंजारमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी जनतेला मदत  



हेही वाचा - 

कधी येणार महापालिकेच्या शाळांमध्ये ‘ई-वाचनालय’?

९ वीच्या विद्यार्थ्यांचे टॅब गेले कुठे?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा