Advertisement

अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर

राज्य शिक्षण विभागानं प्राधान्य फेरीचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात ३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर
SHARES

राज्य शिक्षण विभागानं प्राधान्य फेरीचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात ३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. या टप्प्यात विद्यार्थ्यांना कॉलेज बदलण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ४ या वेळात संबंधित कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश रद्द करावा त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात सहभागी होता येणार आहे.

निकालास उशीर

जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचे निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यानं फेरपरीक्षा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची संधी हुकणार का? अशी भिती विद्यार्थ्यांमध्ये होती. परंतु, गुरुवारी निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य शिक्षण विभागानं प्राधान्य फेरीचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे.

वेळापत्रक जाहीर

  • विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणं३ ते ७ सप्टेंबर.
  • ६० टक्के व अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा ऑनलाइन प्रदर्शित - ७ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता.
  • ज्युनिअर कॉलेज निवडण्याची संधी - ९ सप्टेंबर (सकाळी १० ते सायांकाळी ५ वाजेपर्यंत).
  • कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित - ९ व ११ सप्टेंबर (दुपारी १ वाजेपर्यंत).
  • दहावी उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा ऑनलाइन प्रदर्शित - ११ सप्टेंबर (सायंकाळी ५ वाजता).
  • विद्यार्थ्यांनी कॉलेजची निवड करणे व कॉलेजात जाऊन प्रवेश निश्चित करणं - १३ व १४ सप्टेंबर (सकाळी १० ते सायांकाळी ५ वाजेपर्यंत).
  • एटीकेटी सवलतधारक विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा जाहीर- १४ सप्टेंबर (सायांकाळी ५ वाजेपर्यंत).
  • एटीकेटी सवलत धारक विद्यार्थ्यांना प्राधान्य व कॉलेज निवडण्याची संधी - १६ सप्टेंबर.
  • कॉलेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित - १६ व १७ सप्टेंबर (सकाळी १० ते सायांकाळी ५ वाजेपर्यंत).
  • रिक्त जागांचा तपशील ऑनलाइन प्रदर्शित - १७ सप्टेंबर (सायंकाळी ५ वाजता).



हेही वाचा -

बेस्ट कामगारांचं बेमुदत उपोषण स्थगित

शुक्रवारी होणार दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा