Advertisement

अकरावीची दुसरी यादी वेळे आधीच जाहीर


अकरावीची दुसरी यादी वेळे आधीच जाहीर
SHARES

येत्या 20 जुलैला अकरावी प्रवेशाची दुसरी यादी बुधवारी रात्री 1 वाजता जाहीर करण्यात आली आहे. अकरावीच्या पहिल्या यादीत झालेल्या गोंधळानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या यादीकडे लागले होते. खरेतर 20 जुलैला संध्याकाळी 5 वाजता दुसरी यादी जाहीर होणार होती. 

मात्र केवळ विद्यार्थ्यांना गुरुवारचा दिवस अॅडमिशनसाठी मिळावा यासाठी शिक्षण उपसंचालकांनी बुधवारी रात्रीच यादी जाहीर केली आहे. यादी वेळेच्या आधी जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना गुरूवारचा दिवस मोकळा मिळणार आहे.

या आधी पहिली यादी जाहीर करताना गोंधळ उडाला होता. विविध कारणांसाठी ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश घेता आला नव्हता, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत संधी देण्यात आली आहे. अकरावीच्या पहिल्या यादीत अनेकांनी प्रवेश न घेतल्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी तब्बल 1 लाख 19 हजार 965 जागा शिल्लक आहेत. अकरावीच्या प्रवेशाची दुसरी यादी https://mumbai.11thadmission.net/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

अकरावीत प्रवेशासाठी तब्बल 2 लाख 36 हजार 143 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. यापैकी पहिल्या यादीत 1 लाख 56 हजार 507 विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. त्यातील 79 हजार 474 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अनेक नामांकित महाविद्यालयांच्या पहिल्या यादीचा कट ऑफ 94 टक्के इतका आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कटऑफमध्ये घट झाली आहे.

या वर्षी प्रथम पसंतीक्रमाचे कॉलेज मिळून सुध्दा 10 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे त्या 10 हजार विद्यार्थ्यांचा विचार मंडळ प्रवेशाच्या चारही फेऱ्या झाल्यानंतर करणार आहे.


पुन्हा घोळ नाही ना व्हायचा?

अकरावीची पहिली यादी 10 जुलैला संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार होती. पण ती तब्बल आठ तास विलंबाने म्हणजे रात्री 1 वाजता जाहीर करण्याची नामुष्की शिक्षण उपसंचालक कार्यालयावर ओढवली. पहिल्या वेळची पुनरावृत्ती होते की काय? या विचाराने विद्यार्थी आणि पालकांच्या ह्रदयाची धडधड वाढली नसेल तरच नवल. 

प्रवेश अर्ज भरतानाही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी प्रवेश प्रक्रिया  पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. आता दुसरी यादी तरी वेळेवर जाहीर व्हावी, अशी रास्त अपेक्षा विद्यार्थी आणि पालक व्यक्त करत आहेत. 


अशी आहे नामांकीत कॉलेजची दुसरी कट ऑफ लिस्ट

         मिठीबाई कॉलेज

  • कॉमर्स 87.8 टक्के
  • आर्टस् 83.8 टक्के
  • सायन्स 82.24 टक्के

    रुपारेल कॉलेज
  • सायन्स - 88.7 टक्के
  • आर्टस् - 82.6 टक्के
  • कॉमर्स - 87.0 टक्के

हेही वाचा -

११ वीचे १० हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर

अकरावी प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ; पालकांना दिलासा!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा