Advertisement

हुश्श...11वीची पहिली 'कटऑफ' लिस्ट जाहीर!


हुश्श...11वीची पहिली 'कटऑफ' लिस्ट जाहीर!
SHARES

सोमवारपासून रखडलेली अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी अखेर मंगळवारी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यंदा नव्वदीपार पोहोचलेल्या आणि 100 टक्क्यांचा जादुई आकडा गाठलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. तरी बहुतेक महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी 82 ते 92 टक्क्यांदरम्यान झळकल्याने 80 टक्क्यांहून अधिक टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पहिल्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 11 ते 13 जुलै दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली यादी सोमवारी 5 वाजता जाहीर होणार होती. मात्र ऑनलाईन प्रवेश प्रकियेची तांत्रिक जबाबदारी सांभाळणाऱ्या 'नायसा' कंपनीने पुन्हा घोळ घातल्याने सोमवारी रात्री 12 वाजले तरी यादी जाहीर होऊ शकली नाही. वेबसाईटवर तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून उपसंचालकांनी हात वर केले. यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.


यादीत 4 ते 8 गुणांची वाढ

यंदा दहावीत 95 ते 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने मुंबईतील महाविद्यालयांच्या कटऑफ लिस्टमध्ये 4 ते 8 गुणांची वाढ दिसेल, असे म्हटले जात होते. त्यानुसारच यादी झळकल्याने जास्त टक्के मिळूनही विद्यार्थ्यांना नामांकीत महाविद्यालयांत प्रवेशासाठी कसरत करावी लागणार आहे.

यंदा 'आयसीएसई' आणि 'सीबीएसई'चा निकालही चांगाला लागल्याने त्याचा फटकाही 'एसएससी'च्या विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 35 हजार 484 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पहिल्या यादीत नाव लागल्यास विद्यार्थ्यांनी त्वरीत आपला प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.


नामांकित महाविद्यालयांची गुणवत्ता यादी :


रुपारेल महाविद्यालय
टक्के
आर्ट्स
82.8 %
कॉमर्स
87.57 %
सायन्स
91.2 %रुईया महाविद्यालय
टक्के
आर्ट्स
90.60 %
सायन्स
92.80 %मिठीबाई महाविद्यालय
टक्के
आर्ट्स
83.8 %
कॉमर्स
87.6 %
सायन्स
85.17 %साठ्ये महाविद्यालय
टक्के
आर्ट्स
72 %
कॉमर्स
86.2 %
सायन्स
91 %के. सी. महाविद्यालय
टक्के
आर्ट्स
82.83 %
कॉमर्स
88.80 %
सायन्स
85.40 %वझे केळकर महाविद्यालय
टक्के
आर्ट्स
85 %
कॉमर्स
89.6 %
सायन्स
92.8 %जयहिंद महाविद्यालय
टक्के
आर्ट्स
89.8 %
कॉमर्स
89.4 %
सायन्स
84.6 %
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा