Advertisement

FYJC प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता फेरीचे वेळापत्रक जाहीर

पसंतीक्रम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, विभाग कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करेल.

FYJC प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता फेरीचे वेळापत्रक जाहीर
SHARES

महाराष्ट्र (maharashtra) शालेय शिक्षण विभागाने FYJC (प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय) प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक (merit list) जाहीर केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत जागा मिळाली नाही किंवा ज्यांना आपल्या महाविद्यालय पसंतीक्रमात (preferences) बदल करायचा आहे, ते ठराविक कालावधीत (correction window) आपली पसंतीक्रम यादी बदलू शकतील.

या काळात अर्जदार त्यांच्या प्रवेश अर्जामध्ये आवश्यक ते बदलही करू शकतील.

पसंतीक्रम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, विभाग कनिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करेल.

या रिक्त जागा आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेले सुधारित पसंतीक्रम यांच्या आधारे, दुसरी गुणवत्ता यादी (अलॉटमेंट लिस्ट) तयार करून प्रसिद्ध केली जाईल.

ज्या विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या यादीत येतील, त्यांना नेमून दिलेल्या महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल आणि निश्चित मुदतीत प्रवेश निश्चित करावा लागेल.

दिलेल्या कालावधीत प्रवेश निश्चित न केल्यास, मिळालेली जागा रद्द होऊ शकते.

जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, विद्यार्थी 6 जूनपासून पसंतीक्रमात बदल आणि आवश्यक सुधारणा करू शकतील.

तसेच दुसरी यादी 13 जून रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना अद्ययावत माहिती आणि पुढील सूचनांसाठी अधिकृत FYJC प्रवेश पोर्टल नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो.



हेही वाचा

बेस्ट 181 सेवानिवृत्त सैनिकांची भरती करणार

मध्य रेल्वेवर 6 जूनला पावर ब्लॉक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा