चर्चगेटला भरली संयुक्त राष्ट्र परिषद!

चर्चगेट - जीएलसी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही GLCMUN 2017 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मॉडल संयुक्त राष्ट्र समितीतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान ही परिषद होणार आहे. 2009 पासून दरवर्षी या परिषदेचंचं आयोजन केलं जातं. यंदा या परिषदेचं 9 वं वर्ष आहे.

संयुक्त राष्ट्र अर्थात युएनच्या कार्यपद्धतीप्रमाणेच हे एक प्रति युएन असून युएनच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये सहभागी विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करणार आहेत. हे विद्यार्थी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतात. सहभागी सदस्यांमध्ये आंतरराष्ट्रीय विषय, तसेच चालू घडामोडींविषयीची जागरूकता वाढावी हा या परिषदेचा उद्देश आहे.

Loading Comments