Advertisement

सामाईक प्रवेश परीक्षांसाठी एकच कक्ष!


सामाईक प्रवेश परीक्षांसाठी एकच कक्ष!
SHARES

वैद्यकीय शिक्षणासह विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. मुंबईच्या फोर्ट भागात नुकत्याच स्थलांतरित झालेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आणि प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयाची शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पाहणी केली.


स्वतंत्र हेल्प डेस्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तसेच प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयांचे मुख्य कार्यालय १ जूनपासून फोर्ट इथं स्थलांतरित झालं आहे. या कार्यालयात स्वतंत्र प्रशासकीय कक्ष, वैधानिक कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष, लेखा कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क सीईटी कक्षात उपलब्ध करून देण्यात आलं आहे.


एकाच छताखाली

तंत्रशिक्ष वैद्यकीय शिक्षण, उच्च शिक्षण, आयुष, कला, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय या अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि पालकांसाठी देखील स्वतंत्र मदतकक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी, शाळा सोडल्याचे दाखले आदींची माहिती देण्यात येईल.


कलमापन चाचणीचा आधार घ्या

यावेळी बोलताना तावडे म्हणाले, दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची महिनाभरात फेरपरीक्षा घेण्यात येईल. कलमापन चाचणीचा निकाल आणि पालकांचं समुपदेशन याचा विचार करुन विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारीत परीक्षा द्यावी. केंद्र शासनाच्या नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर म्हणजेच ‘नाटा’ मार्फत घेण्यात येणाऱ्या आर्किटेक्चर परीक्षेत काही अडचणी आहेत, त्यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली जाईल.



हेही वाचा-

'लॉ' अभ्यासक्रमाच्या तुकड्या वाढणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा