Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांनी 'असा' तपासा निकाल

दहावी बोर्डाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी काही पर्याय आम्ही सांगत आहोत.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी 'असा' तपासा निकाल
SHARES

दहावी बोर्डाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. बोर्डानं उत्तीर्ण झालेल्यांची विभागनिहाय सरासरी निकालांची आकडेवारी जारी केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यात सर्वाधिक १००% निकाल कोकण विभागाचा आला आहे. तर सर्वात कमी असला तरीही नागपूर विभागातील ९९.८४% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बोर्डानं जारी केलेल्या सरासरी आकडेवारीनुसार, या वर्षी सुद्धा विद्यार्थिनींनी ०.०२ टक्क्यानं बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी ९९.९४% लागला आहे. तर विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६% आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९७.८४% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

खालील लिंकवर तपासा निकाल


१) http://result.mh-ssc.ac.in

२) www.mahahsscboard.in


निकाल पाहण्यासाठी काही स्टेप्स

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा
  • SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.
  • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.
  • आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.
  • लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.

मोबाइलवर निकाल कसा पहायचा?

  • विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइल फोनवरुन एक एसएमएस करायचा आहे आणि त्या नंतर लगेचच त्यांना मोबाइलवर निकाल पहायला मिळेल.
  • यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यायचा
  • मग आपला Seat Number टाईप करायचा.
  • हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
  • तुम्ही हा एसएमएस पाठवताच अवघ्या काही क्षणात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पहायला मिळेल.

सन २०२१ च्या इयत्ता दहावीत एकूण मुले - ९ लाख ९ हजार ९३१ प्रविष्ट होते, तर मुली - ७ लाख ७८ हजार ६९३ असे एकूण - १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. एकूण आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. राज्य मंडळ स्तरावर ३ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ अखेर या दरम्यान मंडळामार्फत निकाल तयार करण्यात आले होते.

यंदा करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात (Maharashtra Board) प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला.



हेही वाचा

दहावीचा निकाल जाहीर, ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

नीटची परिक्षा १२ सप्टेेंबरला, केेंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा