Advertisement

नीटची परिक्षा १२ सप्टेेंबरला, केेंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोरोना नियमांचं पालन करुन परीक्षांचं आयोजन केलं जाईल, अशी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मास्क उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

नीटची परिक्षा १२ सप्टेेंबरला, केेंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
SHARES

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) १२ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे.  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन नीट परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. १३ जुलैपासून एनटीएच्या वेबसाइटवर अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीटरवरुन दिली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या nta.ac.in किंवा ntaneet.nic.in  या वेबसाईटवर बुधवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होईल, अशी माहितीही प्रधान यांनी दिली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोरोना नियमांचं पालन करुन परीक्षांचं आयोजन केलं जाईल, अशी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मास्क उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचं आणि बाहेर पडण्याची वेळ निश्चित केली आहे. कॉन्टॅक्टरहित नोंदणी, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग पाळून बैठक व्यवस्था केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. देशातील १९८ शहरांमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल. तर २०२० च्या तुलनेत परीक्षा केंद्रांची संख्या ३८६२ करण्यात आली आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे परीक्षा केंद्रावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची ६१५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा