Advertisement

'प्रॅक्टिस पोर्टल'वर या! MHTCET, JEE, NEET परीक्षांचा सराव करा

राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी ऑनलाईन 'प्रॅक्टिस पोर्टल' हे संकेतस्थळ सुरू केलं आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना IIT, MHTCET, JEE, NEET, आदी सामायिक अभ्यासक्रमाचा सराव करता येईल.

'प्रॅक्टिस पोर्टल'वर या! MHTCET, JEE, NEET परीक्षांचा सराव करा
SHARES

राज्यातील विद्यार्थी बारावीपर्यंत महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करतात. मात्र त्यानंतर आयआयटी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा झाल्यास त्यांना सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करावा लागतो. कारण या परीक्षा या अभ्यासक्रमांवर आधारीत असतात. त्यामुळे सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षण मंडळाचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये कमी पडतात. ही पिछेहाट भरून काढण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी ऑनलाईन 'प्रॅक्टिस पोर्टल' हे संकेतस्थळ सुरू केलं आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा सराव करता येईल.


काय असेल पाेर्टलवर?

शिक्षण मंडळाने mcqpractice.mh-hsc.ac.in हे पोर्टल तयार केलं असून त्यावर बारावीच्या पुढील ज्या विद्यार्थ्यांना IIT, MHTCET, JEE, NEET, आदी सामायिक परीक्षा द्यायच्या आहेत. त्यांच्यासाठी सराव परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरूवातीला २५ प्रश्न आणि त्यानंतर त्याहून अधिक प्रश्न सोडवता येतील, अशी या पोर्टलवर व्यवस्था करण्यात आली आहे.


दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांच्या चौकटीबाहेर जाऊन मंडळाने राज्यातील विद्यार्थ्यांना जेईई, राज्य सीईटी, नीट या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि त्यासाठीचं संच उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णय मागील महिन्यात घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर हे पोर्टल राज्यातील लाखो गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
- कृष्णकुमार पाटील, सचिव, राज्य शिक्षण मंडळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा