शिक्षकाच्या बोनससाठी 24 तासांपासून पालिकबाहेर उपोषण

 Pali Hill
शिक्षकाच्या बोनससाठी 24 तासांपासून पालिकबाहेर उपोषण

मुंबई - पालिका कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, खासगी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक अशा सगळ्यांची दिवाळी बोनस मिळाल्यामुळे धुमधडाक्यात साजरी होत असताना मनपाच्या माध्यमिक शाळांतील 150 शिक्षकांची दिवाळी मात्र अंधारात आहे. या शिक्षकांशी पालिका दुजाभावानं वागत असल्याचा आरोप करत या शिक्षकांनाही बोनस मिळावा म्हणून शिक्षण समितीचे सदस्य शिवनाथ दराडे पालिका मुख्यालायाबाहेर उपोषणाला बसले आहेत. गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते उपोषणाला बसले असून 24 तास उलटले, तरी पालिकेकडून मात्र त्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिका माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नी किती उदासीन आहे, हेच स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Loading Comments