ICSE : मुंबईची जुही देशात पहिली

आयसीएसई बोर्डाचा १०वी आणि १२वीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा आयसीएसई बोर्डात मुलींनीच बाजी मारली असून आयसीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेत ९८.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीचा निकाल ९६.५२ टक्के इतका लागला आहे.

SHARE

जुही कजारिया देशात पहिली

जुहूच्या जमनाबाई नरसी शाळेची जुही कजारिया ही विद्यार्थीनी देशात पहिली आली आहे. जुही कजारियाला ९९.६० टक्के गुण मिळाले आहेत. मुंबईचे फोरम संजनवाला आणि अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळी देशात संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ९९.४० टक्के मिळाले आहेत.

आयसीएसई, आयएसई परीक्षांचा निकाल सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. यंदा आयसीएसई १० वीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान झाली. तर, आयसीएसई १२ वीची परीक्षा ४ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्यात आली होती.

असा पाहा, ICSE, ISE निकाल

आयसीएसई, आयएसई परीक्षांचा निकाल  www.cisce.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे.हेही वाचा -

मुंबईतील विहिरींचं पाणीही वापरता येणार, स्वच्छतेसाठी १० लाखांचा निधी

मेट गालामध्ये प्रियंकाची हजेरी, पेहरावावरून झाली ट्रोलसंबंधित विषय
ताज्या बातम्या