Advertisement

विद्यार्थ्यांसाठी अॅप आले धावून...


विद्यार्थ्यांसाठी अॅप आले धावून...
SHARES

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता युवा अॅपद्वारे अॅडमिशन, परिक्षा, निकालाची माहिती मिळणार आहे. 14 मार्चपासून हे अॅप सुरू करण्यात आलंय. तब्बल सव्वालाख विद्यार्थ्यांना याचा फायदा हेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चौकशीसाठी आता फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि मुक्त अध्ययन संस्थेत लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना परिक्षेच्या वेळापत्रकासाठी, अॅडमिशनसाठी विद्यापीठाची वेबसाईट बघावी लागते किंवा विद्यापीठात खेटा मारव्या लागतात. आता या अॅपमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना प्लेस्टोअरवरून ‘युवा आयडॉल’ अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अॅपद्वारे प्रवेश, निकाल, परिक्षा, विविध घडामोडी विद्यार्थ्यांना लगेच समजतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा