Advertisement

उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांच्या जागा तातडीने भरा, यूजीसीचे आदेश

देशभरातील विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा तातडीनं भरण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत.

उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांच्या जागा तातडीने भरा, यूजीसीचे आदेश
SHARES

विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, शासकीय, अशासकीय अनुदानित व खासगी संस्थांमध्ये प्राध्यापकांची पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळं देशभरातील विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा तातडीनं भरण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत. त्याशिवाय, २० सप्टेंबरपर्यंत ही कार्यवाही करण्यात यावी. तसंच मागील २ महिन्यांत पाठविलेल्या परिपत्रकांचा विचार करावा, असंही म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळाता विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

६ महिन्यांची मुदत 

मागील अनेक वर्ष विद्यापीठं, संलग्नित महाविद्यालयं, शासकीय, अशासकीय अनुदानित व खासगी संस्थांमधील प्राध्यापकांची पदं भरलेली नाहीत. कायमस्वरूपी पदं न भरल्यानं हंगामी किंवा तासिका तत्त्वावर पदे भरण्यात येतात. तसचं, रिक्त पदांची संख्या वाढल्याचा विपरीत परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्यानं यूजीसीनं उच्च शिक्षण संस्थांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली होती. तसंच, या मुदतीच्या काळात रिक्त जागा न भरल्यास अनुदान रोखण्याची कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं होतं

वारंवार मुदतवाढ

अनेकदा मुदतवाढ दिली जात असल्यानं आयोगानं राज्यातील अकृषी विद्यापीठांना पत्र पाठवून रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी २० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. यूजीसीनं उच्च शिक्षण विभागातील प्राध्यापकांच्या पुढील ६ महिन्यांत रिक्त होणाऱ्या जागादेखील भरण्याची सूचना केली आहे.हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला हलक्या पावसाची शक्यता

मुंबई-नाशिक प्रवास लवकरच होणार जलद
संबंधित विषय