Advertisement

गणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला हलक्या पावसाची शक्यता

अनंत चतुर्दशीला देखील हलका पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

गणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला हलक्या पावसाची शक्यता
SHARES

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव काळात पडत असलेल्या पावसामुळं गणेश भक्तांचे हाल होत आहेत. एकीकडं बाप्पाच्या खरेदीसाठी वेळ मिळत नाही, तर दुसरीकडं विसर्जनाला विलंब होतो आहे. ५ आणि गौरी गणपतीच्या विसर्जनावेळी मुसळधार पावसानं मुंबईत हजेरी लावली होती. त्यामुळं अनेक गणेश भक्तांनी बाप्पाच्या विसर्जनावेळी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. अशताचं सार्वजनिक बाप्पाच्या विसर्जनावेळी म्हणजे अनंत चतुर्दशीला देखील हलका पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हलक्या पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २ दिवसांत मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाची सक्रियता कमी होणार आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी, कोकण भागात विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर काही ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, गुरुवारी विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.


पावसाची विश्रांती

सध्या मुंबईसह उपनगरात पावसानं विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळते आहे. मंगळवारी दिवसभरात मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी २० ते ४० मिमी पावसाची नोंद झाली. किनारपट्टीवरदेखील पावसाचे प्रमाण मर्यादितच राहिल्याची माहिती मिळते आहे.हेही वाचा -

विकेंडलाही धावणार एसी लोकल

Iphone 11 लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमतसंबंधित विषय