Advertisement

विकेंडलाही धावणार एसी लोकल

आठवड्याचे ५ दिवस धावणारी एसी लोकल आता शनिवार आणि रविवारी देखील धावणार आहे.

विकेंडलाही धावणार एसी लोकल
SHARES

एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आहे. आठवड्याचे ५ दिवस धावणारी एसी लोकल आता शनिवार आणि रविवारी देखील धावणार आहे. त्यामुळं आता एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुट्टीच्या दिवशीही प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसंच, चर्चगेट ते विरार गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

प्रवाशांची मागणी

अनेक महिन्यांपासून एसी लोकल शनिवार आणि रविवारी चालविण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. प्रवाशांची ही मागणी लक्षात घेत़ एसी मार्गस्थ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. प्रथम दर्जापेक्षा १.२ पट जास्त तिकीट भाडं असलं तरी अनेक प्रवाशांची या एसी लोकलला पसंती मिळत होती.

१२ फेऱ्या

२५ डिसेंबर २०१७ रोजी पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावली. त्यावेळी या एसी लोकल फारशी प्रवाशांची मागणी नव्हती. परंतु, हळुहळू या लोकलला प्रवाशांची पसंती मिळाली. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता या एसी लोकलला अतिरिक्त थांबे देण्यात आले. सध्या चर्चगेट ते विरार मार्गावर एसी लोकलच्या १२ फेऱ्या चालवल्या जातातसध्या या फेऱ्या केवळ सोमवार ते शुक्रवारदरम्यान चालवल्या जात होत्यातर शनिवार आणि रविवार या लोकलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी राखून ठेवण्यात आले होते. मात्र, आता ही एसी लोकल विकेंडला देखील धावणार आहे.हेही वाचा -

Iphone 11 लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील इमारतीचा भाग कोसळलासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा