Advertisement

दूर शिक्षण म्हणजे वंचितांना उच्च शिक्षणाची संधी देणे - विष्णू मगरे


दूर शिक्षण म्हणजे वंचितांना उच्च शिक्षणाची संधी देणे - विष्णू मगरे
SHARES

सध्या शिक्षण हे कोणालाही, कोठेही आणि कधीही घेता येत असून अशा ज्ञानाधिष्टीत समाजात आपण सर्वजण राहत आहोत. या समाजातील अनेक वंचित घटकांना शिकता यावं यासाठी दूर व मुक्त शिक्षण संस्था ही एक वरदान ठरत आहे. त्याद्वारे हजारो वंचितांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होत असल्याचं मत मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी व्यक्त केलं. मंगळवारी २९ मे रोजी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या दूर व मुक्त शिक्षण संस्थेच्या संचालकांच्या परिषदेत ते बोलत होते.


नियमावलीत अनेक त्रुटी

मुंबई विद्यापीठाने दूर व मुक्त अध्ययन संस्थेसाठी २०१७ साली काही नियमावली बनवली. परंतु, या नियमावलीत अनेक त्रुटी असून त्यावर विचारविनिमय करण्यासाठी विविध राज्यातील दूर व मुक्त शिक्षण संस्थेच्या संचालकांची एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी राज्यातील अनेक संचालक उपस्थित होते. दरम्यान यावेळी डॉ. विष्णू मगरे यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये होणाऱ्या दूर शिक्षणावरील राष्ट्रीय परिषदेच्या माहितीपत्रकाचं विमोचन केलं.


या सूचना शासनाकडे पाठवणार

दूर व मुक्त अध्ययन संस्थेसाठी शासनाने दिलेल्या नियमावलीबद्दल बोलताना विष्णू मगरे म्हणाले 'या नियमावलीत जी कठोरता आहे किंवा त्यातील काही अडीअडचणी आहेत. तसेच या परीषदेनंतर विविध संचालकांकडून त्यावर काही तोडगा निघेल आणि तुम्ही दिलेल्या या सूचना निश्चितच शासनाकडे पाठवण्यात येतील. तसंच शासन नक्कीच तुम्ही दिलेल्या सूचनांचा विचार करेल असं मत प्र. कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी मांडले.

यासंदर्भात जनजागृती होण्यासाठी भारतातील अनेक विद्यापीठात अशाप्रकारे अनेक परिषद घेण्यात येणार असून परिषदेतून निघालेल्या सूचना शासनाकडे सादर करण्यात येतील.
- प्रा. के. मुरली मनोहर, अध्यक्ष, इंडियन डिस्टन्स एज्युकेशन अससोसिएशन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा