SHARE

चेंबूर - चेंबूर एज्युकेशन सोसायटी या शाळेत 18 नोव्हेंबरला विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी माध्यमांच्या शाळांची दुरवस्था आणि त्यावर ठोस उपाय काढता यावे यासाठी मराठी शाळा सद्य स्थिती आणि उपाय विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक असे 300 जण उपस्थित राहणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या