Advertisement

इस्त्रा शाळेची मान्यता रद्द होणार

दहावी परिक्षेच्या उत्तरपत्रिका चोरी प्रकरणी इस्त्रो शाळेची मान्यता काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर येथील इस्त्रो शाळेतून दहावी बोर्डाच्या ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या.

इस्त्रा शाळेची मान्यता रद्द होणार
SHARES

दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका चोरी प्रकरणी इस्त्रो शाळेची मान्यता काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी राज्य शिक्षण मंडळाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी विरार येथील माऊंट मेरी शाळेची मान्यता रद्द करण्यात आली होती.


काय आहे प्रकरण?

दहिसर येथील इस्त्रो शाळेतून दहावी बोर्डाच्या ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी २ जाणांनी अटकही केली होती. तपासाअंती ३१६ उत्तरपत्रिकांचा शोध लागला. मात्र, उर्वरीत उत्तरपत्रिकांचा शोध लागला नाही. 

यासाठी राज्य शासन मंडळाने एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसीला शाळेने दिलेले उत्तर निष्काळजीपणा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर शाळेची मान्यता काढून घेण्याचा निर्णय या समितीने घेतला आहे. या विरोधात शाळा कोर्टात अपील करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप शाळेकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही.


गुप्त पध्दतीने दिले गुण

ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मिळाल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांना गोपनीय पद्धतीने गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता.



हेही वाचा

दहिसर पेपरफुटी प्रकरण, 'विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा