दहिसरमध्ये दहावीच्या उत्तर पत्रिका गायब

 Dahisar
दहिसरमध्ये दहावीच्या उत्तर पत्रिका गायब
Dahisar, Mumbai  -  

तपासणीसाठी आलेल्या दहावी (एसएससी) बोर्डाच्या 516 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका गायब झाल्याचा प्रकार दहिसर (पू.), घरटनपाडा इथल्या इस्रा शाळेतून उघडकीस आलाय. इस्रा या शाळेने याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेनंतर बोर्ड उत्तर पत्रिका तपासणीसाठी विविध शाळांत पाठवते. दहिसरच्या इस्रा या शाळेत देखील उत्तर पत्रिका तपासणीसाठी आल्या होत्या. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रा या शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र पाठक यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

शाळा प्रशासनाने या संदर्भाची माहिती बोर्ड आणि संबंधित विभागाला दिली आहे. या उत्तर पत्रिका 6 एप्रिल रोजी गायब झाल्या होत्या. तर 8 एप्रिलला या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल झाली. पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.

Loading Comments