• इस्त्रा शाळेतील विद्यार्थ्यांना गुप्त पद्धतीने गुण मिळणार
SHARE

दहिसर येथील इस्रा शाळेतून दहावीच्या विज्ञानाच्या 516 उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. त्यातील 150 उत्तरपत्रिकांचा अद्यापही शोध न लागल्यामुळे त्या उत्तरपत्रिकांना सरासरी पद्धतीने गुण देणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. मात्र हे गुण विद्यार्थ्यांना त्यांच्या निकलामध्ये पाहता येणार नाहीत, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली होती. गेला महिनाभर पोलिसांनी उत्तरपत्रिका शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तपासादरम्यान 316 उत्तरपत्रिका सापडल्या. मात्र अद्यापही 150 उत्तरपत्रिकांचा शोध न लागल्यामुळे गोपनीय पद्धतीने मार्क देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.

13 जून रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल लागला. यावेळी या 150 विद्यार्थ्यांंचे विज्ञानाचे गुण गुणपत्रिकेवर दिसलेच नाहीत. मात्र लवकरच त्यांना हे गुण सांगण्यात येतील असे बोर्डाने जाहीर केले आहे. हे 150 विद्यार्थी कोण होते, हे अद्याप कळू शकलेले नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या