Advertisement

'असहकार' आंदोलन मागे


'असहकार' आंदोलन मागे
SHARES

मुंबई - महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपल्या मागण्या मान्य झाल्यामुळे 12 वी चे पेपर न तपासण्याचा निर्णय मागे घेतला. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महासंघाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले. शिक्षकांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न, शिक्षकांच्या नोकरीवर आलेली गदा, पेंन्शन योजना, तसंच पाच हजार शिक्षकांना आलेल्या नोटीशीवरुन या संदर्भात विनोद तावडेंची बैठक झाली होती. या वेळी अर्थ विभागाशी बोलून मागण्या मान्य केल्या जातील असे अाश्वासन तावडे यांनी दिले होते. मात्र शिक्षण विभागाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे 12 वी च्या पेपर तपासणीवर शिक्षक महासंघाने बहिष्कार घातला. आता शिक्षणमंत्री विनोद तावडेे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर शिक्षक महासंघाने असहकार आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा