Advertisement

दुसरी बैठकही निष्फळ, जे. जे. रुग्णालयाचा संप 'जैसे थे'

सायन रुग्णालयाने देखील जे. जे. रुग्णालयाला पाठिंबा देत आपलं कामकाज बंद केलं आहे. तर के. ई. एम. रुग्णालयाने काम बंद न करता जे. जे. रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सायंकाळी कँडल मार्च काढण्याचं ठरवलं आहे, असं के.ई.एम. रुग्णालयातील मार्डचे अध्यक्ष आलोक सिंग यांनी सांगितलं.

दुसरी बैठकही निष्फळ, जे. जे. रुग्णालयाचा संप 'जैसे थे'
SHARES

'मार्ड' (मेडिकल असोसिएशन आॅफ रेसिडेंट डॉक्टर्स)चे प्रतिनिधी आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यातील दुसरी बैठक देखील निष्फळ ठरल्याने जे. जे. रुग्णालयातील कर्मचारी संप मागे केव्हा घेणार? या प्रतिक्षेत असणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सोमवारी दुपारी पुरती निराशा झाली. जोपर्यंत रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत संपावर ठाम राहण्याचा पवित्रा डाॅक्टरांनी घेतला आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही संप सुरूच राहणार असल्याचं दिसून येत आहे.


कँडल मार्च काढणार

सायन रुग्णालयाने देखील जे. जे. रुग्णालयाला पाठिंबा देत आपलं कामकाज बंद केलं आहे. तर के. ई. एम. रुग्णालयाने काम बंद न करता जे. जे. रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सायंकाळी कँडल मार्च काढण्याचं ठरवलं आहे, असं के.ई.एम. रुग्णालयातील मार्डचे अध्यक्ष आलोक सिंग यांनी सांगितलं.


काय आहे प्रकरण?

मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ११ मध्ये शनिवारी एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी उपस्थित २ निवासी डाॅक्टरांना बेदम मारहाण करत रुग्णालयातील वस्तूंची तोडफोडही केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ 'मार्ड'च्या नेतृत्वाखाली जे. जे. तील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने जे. जे. तील आरोग्यसेवा कोलमडून पडली.


९० टक्के मागण्या मान्य

डाॅक्टरांवर झालेला हल्ला हा निषेधार्ह अाहे. डाॅक्टरांच्या ९० टक्के मागण्या पूर्ण झाल्या अाहेत. रुग्णालयात सीसीटीव्ही अाणि अलार्म प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल. तसंच सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात येईल, असं अाश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं अाहे. 


संपावर ठाम

डाॅक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत संपकरी डाॅक्टरांच्या प्रतिनिधींसोबत दोनदा बैठक घेतली. ही बैठक सकारात्मक झाल्याचं महाजन म्हणाले. रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत सर्वेक्षण करण्याचं महाजन यांनी आश्वासन दिलं असलं, तरी समाधान न झाल्याने डाॅक्टरांनी संपावर ठाम राहण्याचं ठरवलं आहे.



हेही वाचा-

जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

जे. जे. रुग्णालयाचा 'सॅजेस' पुरस्काराने अमेरिकेत सन्मान!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा