Advertisement

जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याने जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. संपामुळे कोणत्याही रुग्णाचे हाल होऊ नये यासाठी निवासी डॉक्टरांनी संप असूनही रुग्णसेवा चालूच ठेवली आहे. सोमवारी जे. जे. रुग्णालयाला पाठिंबा देत सायन रुग्णालयानेदेखील त्यांचं कामकाज बंद केलं आहे.

जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच
SHARES

मुंबईतील जे जे रुग्णालयातील वॉर्डमध्ये सुरक्षाव्यवस्था करण्याची मागणी करत तेथील निवासी डॉक्टरांनी तिसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवला आहे. दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली होती.


सायन रुग्णालयाचाही पाठिंबा

रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याने जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. संपामुळे कोणत्याही रुग्णाचे हाल होऊ नये यासाठी निवासी डॉक्टरांनी संप असूनही रुग्णसेवा चालूच ठेवली आहे. सोमवारी जे. जे. रुग्णालयाला  सायनपाठोपाठ, नायर आणि इतर रुग्णालयांनी पाठींबा देत त्यांचं कामकाज बंद केलं आहे. त्यामुळे हा संप  आणखी चिघळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.


संपूर्ण प्रकार

शनिवारी सकाळी जे जे रुग्णालयाच्या सर्जरी वाॅर्ड क्रमांक 11 मध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी दोन कनिष्ठ निवासी डाॅक्टरांना मारहाण केली. या मारहाणीनंतर जे जे रुग्णालयातील ४०० डाॅक्टर संपावर गेले असून तिसऱ्या दिवशी, सोमवारी संप सुरूच आहे.


बैठक निष्फळ

हा संप मागे घ्यावा यासाठी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक, आरोग्यमंत्री आणि मार्डच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. पण ही बैठक निष्फळ ठरली असून जोपर्यंत वाॅर्डमध्ये सुरक्षा पुरवण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची माहिती मार्डचे जनरल सेक्रेटरी डाॅ. आकाश माने यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली होती. 

हा संप मिटवण्यासाठी सोमवारी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्यासोबतही बैठक घेण्यात आली. मात्र ही बैठकही निष्फळ ठरली. दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.    


हेही वाचा - 

जे जे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांचा संप सुरूच

वेतनवाढीसाठी डॉक्टरांच्या संघटनांचा जे. जे. रुग्णालयात एल्गार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा