Advertisement

जे. जे. रुग्णालयाचा 'सॅजेस' पुरस्काराने अमेरिकेत सन्मान!


जे. जे. रुग्णालयाचा 'सॅजेस' पुरस्काराने अमेरिकेत सन्मान!
SHARES

सन २०१६ साली जे. जे. रुग्णालयात एका महिलेला जडलेल्या ‘पॅराथायरॉइड एडेमोना’ या आजारावर दुर्बिणीने अर्थात एंडोस्कोपिक पद्धतीने करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेमुळे ही महिला पूर्णपणे आजारमुक्त झाली. या शस्त्रक्रियेला जगात मान्यता मिळाली असून यामुळे या रुग्णालयाला ‘सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अँड एंडोस्कोपिक सर्जन’ (सॅजेस) या पुरस्काराने अमेरिकेत सन्मानित करण्यात आलं आहे. जे. जे. रुग्णालयाला मिळालेल्या पुरस्कारांमुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ट्विट करून अभिनंदन केलं आहे.


सलग तिसऱ्यांदा पुरस्कार

या पुरस्कारासाठी हजारांहून अधिक प्रबंध जगभरातून आले होते. यातून छाटणी होत होत अखेर पहिला पुरस्कार जे. जे. रुग्णालयाला जाहीर करण्यात आला. २०१६ पासून सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार जे. जे. ने पटकावला आहे.

ग्रँट रोड येथे राहणाऱ्या फरहात शेख या महिलेवर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. या महिलेमध्ये असलेला ट्युमर हा थायरॉइड ग्रंथीच्या आत लपलेला होता. त्यामुळे, या महिलेला होणारा कंबरदुखी तसंच हाडांच्या दुखण्याच्या त्रासाचं निदानच होत नव्हतं. या महिलेने जे. जे. रुग्णालयात येण्याआधी अनेक डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतरही या आजारावर योग्य तोडगा उपलब्ध झाला नव्हता. ज्यावेळी ही महिला जे. जे. रुग्णालयात आली, त्यावेळी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखालील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची पॅराथॉर्मन तपासणी केली असता या महिलेच्या गळ्यातील थायरॉइड ग्रंथींमध्ये ट्यमुर दडला असल्याचं दिसून आलं.

या ट्युमरमुळे पायाच्या हाडांपर्यंत कॅल्शियमच मिळत नव्हते. त्यामुळे या महिलेच्या जबड्याच्या भागातून उपकरण टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे या शस्त्रक्रियेमुळे शरीराच्या बाह्यभागावर कोणताही क्रण उमटला नाही. यशस्वीरीत्या पार पडलेल्या या शस्त्रक्रियेच्या पद्धतीचे अनुकरण आता जगभरातील डॉक्टर करणार आहेत.


एक्टोपिक पॅराथायरॉइड म्हणजे काय?

एक्टोपिक पॅराथायरॉइड हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. याचं वेळेत निदान होणे कठीण असते. या आजाराने त्रस्त रुग्णाच्या शरीरातील हाडे ठिसूळ होऊ लागतात. रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. वेळीच उपचार न झाल्यास जराही मार लागल्याने हाडे फ्रॅक्चरही होऊ शकतात. हा एकप्रकारचा हार्मोनल डिसऑर्डर असून या आजाराचं निदान होण्यासाठी रुग्णालयात एंडोक्राइन विभाग असणंही आवश्यक असते, असं जे. जे. रुग्णालयाचे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा