Advertisement

JEE Advanced 2020 परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा चिराग फलोर प्रथम

JEE Advanced 2020 Result पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवर लॉग इन करा.

JEE Advanced 2020 परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा चिराग फलोर प्रथम
SHARES

जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल (JEE Advanced 2020 Results) जाहीर झाला आहे. पुण्याच्या चिराग फलोर या ३९६ पैकी ३५२ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर रुडकी झोनमधून कनिषा मित्तल या आयआयटी रुडकीच्या विद्यार्थीनीनं ३९६ पैकी ३१५ मार्क मिळवत १७वा क्रमांक पटकावला आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी JEE Advanced 2020 परीक्षा दिली आहे, ते आपला रिझल्ट ऑनलाईन jeeadv.ac.in वर पाहू शकणार आहेत. JEE Advanced 2020 Result पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://result.jeeadv.ac.in/ या वेबसाईटवर लॉग इन करा. त्यानंतर परीक्षेचा Advanced Roll Number, जन्म तारीख आणि फोन नंबर लिहून सबमिट करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होऊन त्यावर विद्यार्थी आपला रिझल्ट पाहू शकतात.


कसा चेक करायचा JEE Advanced results 2020?

  •  jeeadv.ac.in या वेबसाईटवर जा
  •  होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 link वर क्लिक करा
  •  स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल
  •  त्यानंतर सांगितलेले डिटेल्स भरुन लॉग इन करा
  •  JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल
  •  रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

JEE Advanced 2020 exam या परीक्षेसाठी एकूण १ लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी ४३ हजार २०४ विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी JEE Advanced 2020 exam साठी एकूण १.६ लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी ९६ टक्के विद्यार्थ्यांनी २७ सप्टेंबर रोजी देशभरातील वेग-वेगळ्या सेंटर्सवर परीक्षा दिली होती.



हेही वाचा

तांत्रिक कारणामुळे आयडॉलच्या परीक्षेस मुकलात? आता 'या' तारखेला होणार पुर्नपरीक्षा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 'या' ५ विद्यापीठातील परीक्षा पुढे ढकलल्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा