Advertisement

जेईई अॅडव्हान्समध्ये महाराष्ट्रातील कार्तिकेय देशात पहिला

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडीकेनं घेतलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा १७ वर्षीय कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे.

जेईई अॅडव्हान्समध्ये महाराष्ट्रातील कार्तिकेय देशात पहिला
SHARES

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडीकेनं घेतलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा १७ वर्षीय कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. या परीक्षेत कार्तिकेय गुप्ताला १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. je&erdved.aced.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन निकाल पाहाता येणार आहे. २७ मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.

१०० पर्सेंटाइल

कार्तिकेय गुप्ता हा या आधीही जेईई मेन परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळवले होते. त्यावेळी तो देशात १८ वा आला होता. तर महाराष्ट्रात दुसरा आला होता. कार्तिकेयनं यावर्षीच इयत्ता १२वीच्या परीक्षेत ९३.७० टक्के गुण मिळविले आहेत. देशभरातून या परीक्षेसाठी १ लाख ६१ हजार ३१९ विद्यार्थी बसले होते. यापैकी ३८ हजार७०५ विद्यार्थी पात्र ठरले. कार्तिकेयनं ३७२ पैकी ३४६ गुण मिळवत देशात पहिला नंबर पटकावला आहे. तर दुसऱ्या नंबरवर तेलंगणातील शबानम सहाय हिला ३७२ पैकी ३०८ गुण मिळविले आहेत.

असा पाहा निकाल -

  • विद्यार्थ्यांनी सर्वात आधी जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर www.jeeadv.ac.in जावं.
  • JEE Advanced च्या होमपेजवर जाऊन JEE Advanced Result 2019 च्या लिंकवर क्लिक करा.
  • लिंक ओपन झाल्यानंतर त्याठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि विचारलेली माहिती नीट भरावी.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा निकाल (JEE Advanced Result 2019) होमस्क्रीनवर दिसेल.
  • याठिकाणाहून विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढू शकतात.हेही वाचा -

अखेर मुख्यमंत्र्यांना मिळाला सायबर पोलिस ठाण्यासाठी मुहूर्त

बर्थ डे स्पेशल, राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शनसंबंधित विषय
Advertisement