Advertisement

बर्थ डे स्पेशल, राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. या वेळी त्यांच्या सोबत पत्नी शर्मिला ठाकरे या देखील उपस्थित होत्या.

बर्थ डे स्पेशल, राज ठाकरेंनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. या वेळी त्यांच्या सोबत पत्नी शर्मिला ठाकरे या देखील उपस्थित होत्या.

१४ जून हा राज यांचा ५१ वा वाढदिवस असल्याने राज्याच्या अनेक ठिकाणांहून आलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे. काही महिन्यांपूर्वी राज आणि शर्मिला ठाकरे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका बाप्पाचरणी अर्पण करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात आले होते.  

लोकसभा निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या प्रचार सभांनी धडाका उडवून देणारे राज विधानसभा निवडणुकीत कसा परफाॅर्मन्स देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या भेटीगाटी सुरू असताना राज या निवडणुकीत वेगळं लढतील की आघाडीत सामील होतील, या निर्णयाचीही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. या पार्श्वभूमीवर राज यांनी बाप्पाकडे विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळू दे असंच साकडं घातलं असणार, असं म्हणायला हरकत नाही.  



हेही वाचा-

आदित्य विधानसभा लढवण्याचे संकेत, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहणार नजर

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा