• 'दहावीचं वेळापत्रक बदला'
SHARE

मुंबई - इयत्ता दहावीचे माध्यमिक शालांत परीक्षेच्या बोर्डाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

त्यातील 20 ते 23 मार्च असे सलग चारही दिवस विज्ञान, इतिहास, भूगोल आणि आयटी या विषयांचे पेपर एका पाठोपाठ ठेवण्यात आले आहेत. गेली पाच वर्षे दोन पेपरांमध्ये किमान एक दिवसांची सुट्टी दिली जात होती. जेणेकरुन विद्यार्थ्यांना तयारीला वेळ मिळतो. ही पद्धत का बदलली तसंच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं आणि परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी खुद्द हायकोर्ट हस्तक्षेप करत असताना बोर्डाने उफरटा निर्णय घेण्याचे कारण काय? असा सवाल करणारे पत्र शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बुधवारी पाठवले आहे. यात दहावीचे वेळापत्रक बदला, दोन पेपरांमध्ये सुट्टी द्या अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या