Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात सुविधांचा अभाव!


मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात सुविधांचा अभाव!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील राजबाई टॉवर इथं असलेल्या ग्रंथालयाची सध्या दूरवस्था झाली असून सुविधांचा अभाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच या ग्रंथालयाची लवकरात लवकर दुरुस्ती करून ग्रंथालयाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.


राजाबाई टॉवर येथील विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा वापर लॉ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह, इतर विद्यार्थीही नियमित करत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, याप्रश्नी विद्यापीठाकडे तक्रार केली असता, अामच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ग्रंथालयातील अनेक टेबल व खुर्च्या मोडकळीस आल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसंच ग्रंथालयात फक्त चार पंखे असून विद्यार्थ्यांना उकाड्याचा सामना करत अभ्यास करावा लागत आहे.


काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?

  • ग्रंथालयाची वेळ सध्या सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६ याऐवजी ८ वाजेपर्यंत वाढवावी.
  • ग्रंथालयात केवळ ४ ते ५ पंखे आहेत. त्यामुळे उकाड्यात बसून अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे पंख्यांची संख्या वाढवावी.
  • ग्रंथालयात बंद असलेली वायफाय सेवा पुन्हा सुरू करावी.
  • विद्यार्थ्यांना ई-लायब्ररीची सोय उपलब्ध करून देण्यात यावी.
  • अभ्यासासाठी लागणारी आवश्यक व महत्त्वाची पुस्तके त्वरित उपलब्ध करून देण्यात यावीत.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी अत्यावश्यक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.


समस्यांचे लवकरच निराकरण

विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयाबाबतच्या तक्रारी लक्षात घेत मंगळवारी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांची भेट घेतली. तसेच ग्रंथालयाची तातडीने दुरस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाबाबत असणाऱ्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असं आश्वासन दिलं आहे.


मुंबई विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परंतु सध्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दूरवस्था झाली आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही त्यांनी दखल घेतलेली नाही. विद्यापीठाचे ग्रंथालय लवकरात लवकर सुधारावे, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
- सौमित साळुंखे , एलएलएम विद्यार्थी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा