'तुळसुली' सुवर्ण महोत्सव सोहळा

 Kings Circle
'तुळसुली' सुवर्ण महोत्सव सोहळा

माटुंगा - लिंगेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या प्रशाळेला जून 2016 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्तानं मराठी पाऊल पडते पुढे या मराठी वाद्यवृंदांचा कार्यक्रम शनिवारी 10 डिसेंबरला दुपारी यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला श्रीकांत पालव यांनी विशेष उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला मुंबई आणि ग्रामीण प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद लाभला.

तुळसुली ऐक्यवर्धक संघ यांच्या वतीनं 2016-17 हे वर्ष सुवर्ण मोहत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात आला. 1967 साली सुरू झालेल्या एका प्राथमिक शाळेचं हळूहळू या कनिष्ठ महाविद्यालयात रुपांतर झालं.

Loading Comments