Advertisement

लॉचे निकाल लागले, पण त्यातही गोंधळ!

मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) चे निकाल जाहीर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेत नापास करण्यात आले आहे. तर काही मर्जीतल्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

लॉचे निकाल लागले, पण त्यातही गोंधळ!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन निकाल शुक्रवारी १४ एप्रिलला जाहीर करण्यात आले. बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) चे सेमिस्टर ६ आणि ४ तसेच मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ चे निकाल जाहीर करण्यात आले असून या निकालातही विद्यापीठाने गोंधळ घातल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) चे निकाल जाहीर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षेत नापास करण्यात आले आहे. तर काही
मर्जीतल्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.



नेमक प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठातील मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ मध्ये तीन पेपर असतात. या तीन पेपरपैकी एक परीक्षा प्रॅक्टिकल तर दोन लेखी परीक्षा होतात. हे तिन्ही पेपर १०० मार्कांचे असून यातील प्रत्येक परीक्षेत विद्यार्थ्याला ५० गुण मिळवणे अपेक्षित असते. ह्युमन राईट लॉ या विषयाच्या प्रॅक्टिकल परीक्षेचे गुण हे विद्यापीठातील शिक्षक देत असल्याने शिक्षकांच्या मर्जीतील विद्यार्थ्यांना १०० पैकी ७५ गुण देऊन पास करण्यात आले आहे, तर बाकी विद्यार्थ्यांना फक्त ३५ ते ४० गुण दिले गेल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे एकीकडे लेखीमध्ये पास झालेले विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये नापास करण्यात आले आहे. तर दुसरीकडे प्रॅक्टिकलमध्ये पास झालेले विद्यार्थी लेखी परीक्षेत मात्र नापास झाल्याचं चित्र आहे.



विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ का?

मुंबई विद्यापीठातून ह्युमन राईट्स लॉ या विषयाच्या परिक्षेसाठी एकूण ७६ विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यापैकी २२ विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नापास झाले आहेत. दरम्यान, या सर्व विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत मात्र चांगले गुण मिळाले आहेत. प्रॅक्टिकल परिक्षेत गुण कमी मिळाल्याने या सर्व विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ आली आहे.


लेखी परिक्षेत पास होऊनही विद्यार्थ्यांना जाणूनबुजून प्रॅक्टिल परीक्षेत नापास करण्यात आले आहे. ही प्रॅक्टिकल परीक्षा प्राध्यापक रश्मी ओझा यांनी घेतली असून यामुळे शिक्षकांच्या हातात किती इंटरनल मार्क ठेवायचे? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तसेच विद्यार्थी नापास होण्याइतके गुण जर शिक्षकांच्या हातात देण्यात येणार असतील, तर हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळला जात आहे.

अॅड. यज्ञेश कदम, मुंबई हायकोर्ट



'मी उत्तर देण्यास बांधील नाही'

यासंदर्भात 'मुंबई लाइव्ह'ने प्राध्यापक रश्मी ओझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 'या सर्व विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामगिरीवर हे गुण अवलंबून असतात. त्यांनी कामगिरी चांगली न केल्याने त्यांना कमी गुण मिळाले आहेत. तसेच मी तुम्हाला उत्तरे देण्यास बांधील नसून यांसदर्भात मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही,' असे सांगत त्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली.

आधीचा ऑनलाईन पेपर तपासणी आणि त्यामुळे निकाल लावण्यात झालेली दिरंगाई या प्रकारामुळे निर्माण झालेला गोंधळ कमी होत नाही, तेवढ्यात हा नवीन गोंधळ विद्यापीठात सुरू होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

लॉ च्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा