Advertisement

लॉ च्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा


लॉ च्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा
SHARES

उशिरा लागलेले निकाल, त्यात परीक्षाही लवकर जाहीर झालेल्या या सर्व गोंधळामुळे वैतागलेल्या मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. लॉ च्या विद्यार्थ्यांनी परिक्षा आणि मूल्यमापन विभागाकडे केलेल्या मागणीनुसार, शुक्रवारी आठ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. लॉच्या पुढे ढकलेल्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या लॉ शाखेच्या परीक्षांमधील तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर न झाल्याने हे विद्यार्थी अडचणीत आले होते. पुढील परीक्षा तोंडावर आली तरी विद्यापीठ काहीच निर्णय घेत नसल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक देत ठोस निर्णय घेण्याची मागणी केली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार एलएलबी सेमिस्टर १, पाच वर्षीय लॉ अभ्यासक्रमाचा सेमिस्टर ५, एलएलबी सेमिस्टर ५ यांसारख्या इतर विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.


लॉ चे निकालही जाहीर

दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या रखडलेल्या निकालापैकी तीन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले असून त्यात बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी)चे सेमिस्टर ६ आणि ४ तसेच मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर ३ च्या निकालांचा समावेश आहे.


सोमवारी शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक

लॉ शाखेच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थी संघटनांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत विद्यापीठ अधिकाऱ्यांसह परीक्षा विभागाची विशेष बैठक सोमवारी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोलावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा