• 'लॉ'च्या विद्यार्थ्यांना लोंडशेडिंगचा फटका
SHARE

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा, वेळापत्रक, आणि निकाल गोंधळाने आधीच हैराण असलेल्या 'लॉ' शाखेच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी नव्या गोंधळला सामोर जावं लागलं. पनवेलमधील एका परीक्षा केंद्रावर लोंडशेडिंगमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने 'लॉ'चा पेपर तब्बल दीड तास उशिरा सुरू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.


काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने 'लॉ' शाखेचा निकालगोंधळ सावरण्यासाठी एकूण आठ परीक्षा कॉलेजांकडे सोपवण्याच्या निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर एलएलबीच्या दुसऱ्या सेमिस्टरमधील कॉन्ट्रॅक्ट-२ हा पेपर मंगळवारी दुपारी ३ ते ६ दरम्यान पनवेल येथील सेंट विल्फ्रेड कॉलेजमध्ये घेण्यात आला. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे कॉलेजकडून पेपर डाऊनलोड होऊ शकला नाही, आणि त्यामुळे या परीक्षाकेंद्रावर ही परीक्षा तब्बल दीड तासानंतर सुरू झाली.

त्या कॉलेजने विद्यार्थ्यांना उत्तरं लिहिण्यासाठी पुरेसा वेळ वाढवून दिला असला तरी घडलेल्या एकंदर प्रकारामुळे त्यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तसंच या घटनेनंतर विद्यापीठाने कॉलेजांकडे सोपवलेल्या परीक्षांबाबत पुनर्विचार करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

या परिक्षेकारता आलेले बरेच विद्यार्थी हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि अलिबाग या ठिकाणी राहणारे असून त्यांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे पनवेल शहरात मंगळवारी लोडशेडिंग होत असून त्यामुळे पेपर डाऊनलोड करता आला नाही, अशी उत्तरं आम्हाला कॉलेजकडून दिली गेली.
- सिद्धार्थ इंगळे, एलएलबी विद्यर्थी

तसेच पनवेल शहरात मंगळवारी लोडशेडिंग होत हे माहीत असूनही कॉलेज प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी का केली नव्हती असा प्रश्नही सिद्धार्थ इंगळेने विचारला.

घडलेल्या या प्रकाराबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या परीक्षांसाठी कॉलेज प्रशासनाने तयार असायला हवं आणि त्याची विद्यापीठाने खातरजमा करायला हवी. प्रश्नपत्रिकेचे प्रिंटआउट काढण्यात कॉलेजांचा वेळ जातो. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं या विलंबामुळे लक्ष विचलित होतं.
- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही त्यांनी केला. याचसोबत विद्यापीठाने कॉलेजांकडे सोपवलेल्या परीक्षांचा निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केल्याचं सचिन पवार म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या