Advertisement

१०वी नंतर आता १२वी तही नापास शेरा पुसणार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या १२वी परीक्षेच्या गुणपत्रिकेतून 'अनुत्तीर्ण' हा शेरा पुसून टाकण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे.

१०वी नंतर आता १२वी तही नापास शेरा पुसणार
SHARES

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (State Board of Secondary and Higher Secondary Examinations) १२वी परीक्षेच्या गुणपत्रिकेतून (Result) 'अनुत्तीर्ण' हा शेरा पुसून टाकण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं (School Education Department) घेतला आहे. १०वीसाठी ४ वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला असून, आता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठीही फेब्रुवारी-मार्च २०२०च्या परीक्षेपासून नवा निर्णय (Rules) लागू होणार आहे.

विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शेरे पद्धती ३० ऑगस्ट २०१६ च्या आदेशानुसार लागू करण्यात आली होती.

ही नवीन शेरे पद्धती आता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही (Students) अमलात आणण्यात येणार आहे. विद्यार्थी एक-दोन विषयांमध्ये किंवा ३ पेक्षाही अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास फेरपरीक्षेस पात्र (एलिजिबल फॉर री-एक्झाम) असा शेरा गुणपत्रिकेत नोंदवला जाणार आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत एक-दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेस पात्र असा शेरा नोंदविला जाणार असून, ३ पेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत 'कौशल्य विकास अभ्याक्रमासाठी पात्र' असा शेरा नोंदवला जाणार आहे.



हेही वाचा -

मुंबईत येत्या २ वर्षांत २० नवे मॉल्स

लोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी; मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अनोख आंदोलन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा