Advertisement

होमिओपॅथिक महाविद्यालयासाठी सरकारचे प्रयत्न

महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.

होमिओपॅथिक महाविद्यालयासाठी सरकारचे प्रयत्न
SHARES

महाराष्ट्र शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे ‘केशरबाई सोनाजी क्षीरसागर’ उर्फ ‘केशरबाई काकू’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होते. या वेबिनारला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केशबाईकाकूंचे चिरंजीव व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. (maharashtra government gives support for new homeopathic colleges says amit deshmukh)

याप्रसंगी बोलताना अमित देशमुख म्हणाले, “केशरबाई काकूंनी बीड येथे सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेजची स्थापना केली. आजवर या होमिओपॅथिक कॉलेजमधून अनेक नामवंत होमिओपॅथी डॉक्टरांनी शिक्षण प्राप्त केले व लौकिक मिळवला आहे. कोविड -१९ महामारीच्या काळात जगभर सर्व उपचार पद्धती कोरोना रुग्णांवर शक्य ते सर्व उत्तम उपचार करत आहेत. त्यात होमिओपॅथीदेखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक व सर्वांना परवडेल अशी उपचार पद्धती आहे.” असंही अमित देशमुख यांनी म्हटलं.

हेही वाचा - तांत्रिक कारणामुळे आयडॉलच्या परीक्षेस मुकलात? आता 'या' तारखेला होणार पुर्नपरीक्षा

एकीकडे भारतातील एकूण होमिओपॅथी वैद्यकीय कॉलेजपैकी एक चतुर्थांश कॉलेज ही एकट्या महाराष्ट्रात असून राज्यात अजून एकही शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय कॉलेज नाही यावर त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त करून उपस्थितांना खात्री दिली की त्यांच्या येत्या कार्यकाळात राज्य शासनाद्वारे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील व गरज पडेल तिथे केंद्र सरकारची मदतदेखील घेतली जाईल असंही अमित देशमुख म्हणाले.

या वेबिनारमध्ये नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.रामजी सिंग, आमदार विक्रम काळे, काकू नाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. कालिदास थिगळे यांच्यासहित होमिओपॅथी वैद्यक क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा