Advertisement

एमपीएससीला मास कॉपीचं ग्रहण

मागील दोन वर्षांपासून या परीक्षेची बैठक व्यवस्था उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकानुसार निश्चित करण्यात येते. त्यामुळं या परीक्षेत मास कॉपी होण्याची भीती खुद्द विद्यार्थ्यांकडूनच वर्तवण्यात येत आहे.

एमपीएससीला मास कॉपीचं ग्रहण
SHARES

१७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या परीक्षा सुरू होणार आहेत. मागील दोन वर्षांपासून या परीक्षेची बैठक व्यवस्था उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकानुसार निश्चित करण्यात येते. त्यामुळं या परीक्षेत मास कॉपी होण्याची भीती खुद्द विद्यार्थ्यांकडूनच वर्तवण्यात येत आहे.


नेमकं प्रकरण काय?


येत्या रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर एमपीएससी परीक्षा होणार आहे. दोन वर्षांपूर्वी या परीक्षेची बैठक व्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांकाप्रमाणे आसन व्यवस्था निश्चित करण्यात येते. याचा गैरफायदा घेऊन काही खासगी क्लासेसमधील विद्यार्थी एका पाठोपाठ एक क्रमांक असणारे नवी सीम कार्ड्स खरेदी करतात. याच सीम कार्ड्स क्रमांक फॉर्मवर टाकण्यात येतो. बदललेल्या बैठक व्यवस्थेमुळे नंतर तोच त्यांचा आसन क्रमांकही बनतो. यामुळे मास कॉपी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


असा झाला पर्दाफाश

काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या संकेतस्थळावरील प्रोफाईल अपडेट करू देण्याची मागणी केली होती. आयोगानं ही मागणी मान्य करत विद्यार्थ्यांना प्रोफाईल अपडेट करण्याची संधी दिली. त्यात काही विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल क्रमांक बदलले. त्यानंतर बऱ्याच उमेदवारांचे क्रमांक एका मागोमाग आले. या विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी करण्याच्या उद्देशानेच नवीन मोबाईल क्रमांक अपडेट केल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या प्रकारानंतर आयोगानं यात तातडीनं लक्ष घालण्याची मागणी प्रामाणिक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.


एमपीएससीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना विविध कोड्सचे पेपर देण्यात येत असल्यानं कॉपी सारखे गैरप्रकार होत नाहीत. त्याशिवाय यासाठी आयोग विविध उपाययोजना करत असून, परीक्षेच्या काळात दक्षता पथकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

- चंद्रशेखर ओक, अध्यक्ष, एमपीएससी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा